आंबेगाव येथे एसटी चालकाची गाडीच्या शिडीला गळफास लावून आत्महत्या

एसटी चालकाने आज सकाळी गाडीच्या शिडीलाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याण - डिंभा ही वस्तीची गाडी सुपेधर, ता. आंबेगाव येथे होती. 

Updated: Oct 10, 2015, 05:53 PM IST
आंबेगाव येथे एसटी चालकाची गाडीच्या शिडीला गळफास लावून आत्महत्या title=

पुणे : एसटी चालकाने आज सकाळी गाडीच्या शिडीलाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याण - डिंभा ही वस्तीची गाडी सुपेधर, ता. आंबेगाव येथे होती. 

कल्याण - डिंभा या एसटीचे चालक कारभारी विठ्ठल गिते यांनी आज सकाळी गाडीच्या मागील बाजुच्या शिडीला गळफास लावून घेतला.  दरम्यान, त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही.

कल्याण येथून सुटलेली गाडी आंबेगाव तालुक्यातील सुपेधर येथे मुक्कामी होती. चालक आणि वाहक यांनी रात्रीचे जेवन घेतले. त्यांनी गावातील ओळखीच्या लोकांशी गप्पाही मारल्यात. त्यानंतर दोघेही झोपी गेलेत. सकाळी वाहक प्रेमलाल भोई यांनी चालक गिते यांना उठवण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वाहकाने ग्रामस्थांच्या मदतीने हा प्रकार घोडेगाव पोलीस ठाण्यात कळविला. 

कारभारी गिते हे आहमदनगर जिल्हातील पार्थडी कोल्हार येथील मूळचे आहेत. ते सध्या कल्याण, कोर्ट परीसर येथे राहतात. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. त्यांनी आत्महत्या का केली, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.