अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकी पत्र

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र आलंय.  या पत्रात अरविंद केजरीवाल यांचं नाव घेऊन अण्णांना धमकवण्यात आलंय.

Updated: Aug 11, 2015, 04:06 PM IST
अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकी पत्र  title=

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र आलंय.  या पत्रात अरविंद केजरीवाल यांचं नाव घेऊन अण्णांना धमकवण्यात आलंय.

राळेगणमध्ये शांत बसा, अन्यथा तुमचा दाभोलकर आणि पानसरे करू, असंही या पत्रात म्हटलंय. या संदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 

अण्णांनी मात्र या धमक्यांना भिक घातलेली नाही. अशा धमक्या येतच असतात, त्याला मी घाबरत नाही, असं अण्णा म्हणाले. मात्र त्याच वेळी केजरीवाल राजकारणात गेल्यापासून आपल्या त्यांच्याशी संबंध नसल्याचंही अण्णा आवर्जुन सांगतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.