औरंगाबादमधील महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलं

महापालिकेत गेली काही दिवस सुरु असलेलं महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलंय. सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर त्रिम्बक तुपे यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्याप्रमाणे येत्या 4 दिवसात महापालिका सर्वसाधारण सभा होणार आणि त्यात महापौर राजीनामा देणार हे निश्चित झालं आहे.

Updated: Nov 20, 2016, 01:06 PM IST
औरंगाबादमधील महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलं title=

औरंगाबाद : महापालिकेत गेली काही दिवस सुरु असलेलं महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलंय. सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर त्रिम्बक तुपे यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्याप्रमाणे येत्या 4 दिवसात महापालिका सर्वसाधारण सभा होणार आणि त्यात महापौर राजीनामा देणार हे निश्चित झालं आहे.

महापौर त्रिम्बक तुपे यांच्यासोबत उपमहापौर प्रमोद राठोसुद्धा त्यांच्या पदाचा राजीनामा देतील. आता पुढचा एक वर्ष भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे. निवडणुकीत ठरलेल्या फॉर्मुलानुसार शिवसेनेने दीड वर्ष संपल्याबरोबर राजीनामा देणं गरजेचं होतं. मात्र मातोश्रीवरुन आदेश न आल्याने राजीनामा होणार नाही असे चित्र होते. भाजपकडून सतत पाठपुरावा सुरु होता. मात्र शिवसेना गंभीरपणे घेत नव्हती. अखेर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि याबाबत निर्णय झाला. आता पुन्हा भाजप आणि शिवसेनेत इच्छुकांमध्ये चढाओढ सुरु होणार आहे.