उल्हासनगरमध्ये भाजपची सत्ता, महापौरपदी मीना आयलानी

उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी तर उपमहापौरपदी जीवन उर्फ राजू इदनानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Updated: Apr 5, 2017, 05:52 PM IST
उल्हासनगरमध्ये भाजपची सत्ता, महापौरपदी मीना आयलानी  title=

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी तर उपमहापौरपदी जीवन उर्फ राजू इदनानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शिवसेनेसोबत ६ पक्षांनी सभात्याग केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. कोकण आयुक्तांनी ३१ मार्चला साई पक्षांची गट म्हणून मान्यता रद्द केली होती. मात्र ३ एप्रिलला पुन्हा कोकण आयुक्तांनी साई पक्षाला गट म्हणून मान्यता दिली. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना आणि आरपीआयने कोकण आयुक्तांचा निषेध करत महापौर निवडणुकीतून सभात्याग केला, त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.