बिल्डरला 'मोफा' कायद्याअंतर्गत अटक, सदनिका हस्तांतरणास उशिर

पोलिसांनी साहेबराव कदम नावाच्या बांधकाम व्यावसायिकाला (बिल्डर) अटक केली आहे. सरकारने केलेल्या 'मोफा' म्हणजेच सदनिका हस्तांतरण कायद्यांतर्गत ही पहिलीच कारवाई आहे. 

Updated: Aug 12, 2016, 11:30 PM IST
बिल्डरला 'मोफा' कायद्याअंतर्गत अटक, सदनिका हस्तांतरणास उशिर title=

नाशिक : पोलिसांनी साहेबराव कदम नावाच्या बांधकाम व्यावसायिकाला (बिल्डर) अटक केली आहे. सरकारने केलेल्या 'मोफा' म्हणजेच सदनिका हस्तांतरण कायद्यांतर्गत ही पहिलीच कारवाई आहे.

 

१९९४ साली सदनिका विकत घेऊनही आजपर्यंत त्याची खरेदी आणि हस्तांतरण केलं नसल्या प्रकरणी, पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांचं धाबे दणाणलं आहे. पोलिसांनी अशा प्रकारे फसवणूक झालेल्या इतर सदनिका धारकांनाही व्यावसायिकांविरोधात तक्रार देण्याचं आवाहनही केले आहे. 

दरम्यान, नव्याने बांधलेल्या गृहसंकुलामधील रहायला आलेले ५१ टक्के फ्लॅटधारक एकत्र आल्यास त्यांना गृहनिर्माण सोसायटी स्थापन करता येणार आहे. राज्याच्या सहकार खात्याने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपलब्ध झालेय. आता विक्री न करता स्वत:च्या नावावर जाणीवपूर्वक फ्लॅट शिल्लक ठेऊन सोसायटी स्थापन करण्यास अडथळा आणणाऱ्या बिल्डरांना चाप बसणार आहे.