राष्ट्रवादीला अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर, आम्ही ठेका घेतलेला नाही!

राष्ट्रवादीला वाढविण्याची आमची जबाबदारी नाही. आम्ही काय ठेका घेतला आहे का, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

Updated: Sep 13, 2016, 11:07 PM IST
राष्ट्रवादीला अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर, आम्ही ठेका घेतलेला नाही! title=

नंदुरबार : राष्ट्रवादीला वाढविण्याची आमची जबाबदारी नाही. आम्ही काय ठेका घेतला आहे का, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

राष्टवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळात नफा-नुकसान दोन्ही पक्षांचे झाले आहे. जसा तोटा राष्ट्रवादीचा झाला तसे नुकसान काँग्रेसचे राष्ट्रवादीमुळे झाले आहे, असे चव्हाण म्हणालेत.

दरम्यान, काँग्रेस पक्षानेच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले. गेल्या पाच वर्षात काँग्रेसबरोबर राहिल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान झाले, अशी परखड टीका राष्ट्रवादी काँग्रसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली. ते सोमवारी अकोल्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. 

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमी बदनाम करण्यासाठी प्रयत्न केले. चव्हाण यांनीच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवले, असा आरोप पटेल यांनी केला होता.