बॉम्बच्या भितीने नागपूरला विमानाचं लँडिंग, अफवा असल्याचे उघड

बॉम्ब असल्याच्या भितीने तातडीने भुवनेश्वरहून मुंबईकडे जात असलेले गो एअर कंपनीचे विमान नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. तपासणीनंतर ही बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

Updated: Jan 23, 2016, 01:27 PM IST
बॉम्बच्या भितीने नागपूरला विमानाचं लँडिंग, अफवा असल्याचे उघड title=

नागपूर : बॉम्ब असल्याच्या भितीने तातडीने भुवनेश्वरहून मुंबईकडे जात असलेले गो एअर कंपनीचे विमान नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. तपासणीनंतर ही बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

बॉम्बच्या अफवेमुळे भुवनेश्वर-मुंबई विमान नागपूरला उतरवलं. भुवनेश्वरहून विमानाने मुंबईकडे उड्डाण घेतल्यानंतर विमानात काही संशयास्पद वस्तू आढळून आली. याबाबतची माहिती प्रशासनाकडे देण्यात आल्यानंतर नागपूरमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. 

नागपूर विमानतळावर बॉम्ब निकामी पथकाला तत्काळ पाचारण करून विमानाची तपासणी करण्यात आली. सर्व प्रवाशांना विमानातून उरतविण्यात आले आहे. बॉम्बची अफवा असल्याचे समजल्यानंतर विमान पुन्हा मुंबईकडे पाठविण्यात आले.