मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात रेल्वे वाहतूक ठप्प

सफाळे येथे मालगाडीचे दोन डबे घसरल्याने मुंबईकडे येणारी आणि गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 7, 2017, 09:35 PM IST
मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात रेल्वे वाहतूक ठप्प title=

मुंबई : सफाळे येथे मालगाडीचे दोन डबे घसरल्याने मुंबईकडे येणारी आणि गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे मालगाडी आली असता सायंकाळी घसरली. ही मालगाडी मुंबईकडे येत होती. या अपघातामुळे या मार्गावरील सर्व गाड्या खोळंबल्या आहेत.  या मार्गावरील वाहतूक सुरळित होण्यास तीन ते चार तास लागण्याची शक्यता आहे.

मालगडीचे डबे बाजूला घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी क्रेनही मागवल्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या मार्गावरील रेल्वे वाहतूक रखडली आहे.