येत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पाऊस- हवामान खातं

Updated: Jul 15, 2014, 10:06 PM IST
येत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पाऊस- हवामान खातं title=

 

अलिबाग:  हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात 70 मिमी ते 120 मिमी एवढा मुसळधार पावसाची शक्यता आहे. आवश्यक ती खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. 

जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.  संबंधित विभागांनी दर दोन तासांनी परिस्थितीचा अहवाल दूरध्वनीवर कळवावा. सावधगिरीचा उपाय म्हणून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, सर्व संबंधितांनी याची दखल घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलंय. 

दरम्यान, नवी मुंबईत आज संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. जोरदार वाऱ्यासह तबब्ल चार तास सुरु असल्यानं ठिकठिकाणी पाणी साचलं होतं . पाण्यातून मार्ग काढून वाहतूकही धिम्यागतीनं सुरु होती.

आज दिवसभरात  नवी मुंबई महापालिका क्षेत्रात  संध्याकाळपर्यंत ५३. ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये बेलापूर मध्ये ६३. मिमी , नेरूळ ८७ मिमी , वाशी - ४९ मिमी , ऐरोली  २७ मिमी  पावसाची नोंद  झाली आहे . 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.