हेमलकसाच्या बारावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे यश तुम्हालाही थक्क करेल

बाबा आमटेंनी सुरु केलेला शिक्षणाचा प्रवाह त्यांच्या पुढच्या पीढिनंही अविरत सुरूच ठेवलाय... आज बारावीचा निकाल लागलाय... आणि या निकालात या आदिवासी विद्यार्थ्यांनी आमटेंच्या या कष्टाचं चीज केल्याचं सिद्ध झालंय.

Updated: May 25, 2016, 07:50 PM IST
हेमलकसाच्या बारावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे यश तुम्हालाही थक्क करेल title=

हेमलकसा : बाबा आमटेंनी सुरु केलेला शिक्षणाचा प्रवाह त्यांच्या पुढच्या पीढिनंही अविरत सुरूच ठेवलाय... आज बारावीचा निकाल लागलाय... आणि या निकालात या आदिवासी विद्यार्थ्यांनी आमटेंच्या या कष्टाचं चीज केल्याचं सिद्ध झालंय.

हेमलकसा इथल्या लोक बिरादरी ज्युनियर कॉलेजचे ९७.३७ टक्के विद्यार्थी बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत. आत्राम पंकज महारू या आदिवासी विद्यार्थ्यानं तब्बल ५२१ गुण (८०.१५ टक्के) मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावलाय. या शाळेतले २१ विद्यार्थी फर्स्ट क्लास मिळवून पास झालेत. 

'शिक्षण' हा असा एकच पर्याय आहे ज्याने जमातीतील लोकांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देता येईल आणि म्हणूनच परिस्थिती सुधरवण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, असा बाबा आमटेंचा विश्वास होता... आणि हाच विश्वास आज या विद्यार्थ्यांनी सार्थ करून दाखवलाय.