नोकरीचं आमिष दाखवून महिलेची विक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड

नोकरीचं आमिष दाखवून एका महिलेला विकू पाहणाऱ्या टोळीचा भांडाफोड, नांदेड रेल्वे स्थानकातल्या दक्ष फळविक्रेत्या महिलांमुळं होऊ शकला. 

Updated: Nov 5, 2015, 10:14 AM IST
नोकरीचं आमिष दाखवून महिलेची विक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड title=

नांदेड: नोकरीचं आमिष दाखवून एका महिलेला विकू पाहणाऱ्या टोळीचा भांडाफोड, नांदेड रेल्वे स्थानकातल्या दक्ष फळविक्रेत्या महिलांमुळं होऊ शकला. 

आणखी वाचा - पुण्याच्या दोघा तरुणींचे अपहरण करुन बलात्कार, त्यानंतर बियर पाजली आणि...

सोलापूरमधल्या एका २७ वर्षांच्या महिलेचं नोकरी देण्याच्या आमिषानं, ३ पुरुष आणि एका महिलेनं सोलापूर रेल्वे स्थानकावरुन अपहरण केलं. त्यानंतर तिला या टोळक्यानं नांदेड रेल्वे स्थानकावर आणलं. मात्र तिथल्या फळविक्रेत्या महिलांना या टोळक्याच्या एकंदर वावरण्याचा संशय आला म्हणून त्यांनी अधिक चौकशी केली.

आणखी वाचा - दुसऱ्या लग्नाबाबत कळलं म्हणून पोलीस उपनिरीक्षकानं केली पत्नीची हत्या

या दरम्यान ३ पुरुष साथीदार पळून गेले. मात्र फळविक्रेत्या महिलांनी त्या महिला आरोपीला पकडून ठेवलं. त्याचवेळी फळविक्रेत्या महिलांनी रेल्वे पोलिसांना बोलावून घेतलं. त्यांच्या चौकशीत खरा प्रकार उघड झाला आणि पुढला अनर्थ टळला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.