नाशिक : चार दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पुण्याहून कामानिमित्त आलेल्या दोघा मुलींवर अपहरण करुन नाशिकमध्ये बलात्कार करण्यात आला. दरम्यान, त्यानंतर त्यांना बियर पाजून त्यांच्यावर अतिप्रसंग करुन वाऱ्यावर सोडून दिले. यातील एक मुलगी अल्पवयीन आहे.
पुण्याहून नाशिकमध्ये खासगी कामासाठी आलेल्या मयूर वाघमारे आणि पवन भोळे या दोघा तरूणांनी रेल्वेस्थानकावरून फूस लावून दोन तरूणींना एका लॉजवर नेले. यापैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. या मुलींवर बलात्कार करून हे नराधम थांबले नाहीत. त्यानंतर त्यांनी नाशिकरोड रेल्वेस्टेशनला लागून असलेल्या महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रूग्णालयाच्या मागील बाजून नेऊन बियर पाजून पुन्हा अतिप्रसंग करून सोडून दिल्याचा प्रकार घडलाय. लोहमार्ग पोलिसांना गस्त घालताना या तरूणी आढळून आल्या.
रेल्वेस्थानक परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने समोर आलाय. रेल्वे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी १८२ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केलाय. या क्रमांकाचा मदतीसाठी जास्तीत जास्त प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.