इन्कम टॅक्स विभागाचे मराठवाड्यात १७ ठिकाणी छापे

नोटाबंदीच्या काळात बँकेत अधिक पैसे जमा करणाऱ्यांविरोधात प्राप्तीकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 5, 2017, 10:06 PM IST
इन्कम टॅक्स विभागाचे मराठवाड्यात १७ ठिकाणी  छापे title=

औरंगाबाद : मराठवाड्यात १७ ठिकाणी इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकले आहेत.  केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) मराठवाड्यातील ४०० जणांची यादी तयार केली. आतापर्यंत १७ ठिकाणी छापे मारण्यात आले. नोटाबंदीच्या काळात बँकेत अधिक पैसे जमा करणाऱ्यांविरोधात प्राप्तीकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

औरंगाबादेतील ८, वैजापुरातील २, जालन्यातील २, बीडमधील २, तर लातूरमधील ३ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. प्राप्तीकर विभागाने चार दिवसांपासून औरंगाबादसह वैजापूर, जालना, बीड आणि लातूरमधील १७ ठिकाणी छापे टाकून सुमारे १० कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशोबी रक्कम उघड केली आहे. 

हा पगार संपूर्ण जुन्या नोटांचा स्वरुपात होता, अशीही माहिती या कारवाईतून पुढे येत आहे. मात्र तो कारखाना कोणता होता, त्याचा तपशील अद्याप जाहीर केला गेलेला नाही. परळीजवळच्या एका कारखान्यात नोटाबंदीवेळी कामगारांना १ कोटींचा आगाऊ पगार दिला गेला. 

नोटाबंदीच्या काळात बचत खात्यांमध्ये अडीच लाख किंवा त्यापेक्षा अधिक व्यवहार झालेले खातेधारक तसेच चालू खात्यांमध्ये १२ लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केलेल्यांची माहिती बँकांद्वारे प्राप्तीकर विभागाला प्राप्त झाली आहे. त्यावरुन प्राप्तीकर विभागाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर न देणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरु करण्यात आली आहे.