महागाईचा कहर, तुरडाळ १५० रुपये किलो

 महागाई नियंत्रणात आणल्याचे सरकारी दावे होत असले तरी त्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे कडधान्याच्या किंमतींवरून सहज लक्षात येईल. मागचे सर्व विक्रम मोडीत काढत नागपूरमध्ये तूरडाळीने 150 रूपये किलोचा पल्ला गाठलाय. त्यामुळे तूरडाळीत भेसळ होत असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Updated: Sep 15, 2015, 03:39 PM IST
महागाईचा कहर, तुरडाळ १५० रुपये किलो title=

नागपूर :  महागाई नियंत्रणात आणल्याचे सरकारी दावे होत असले तरी त्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे कडधान्याच्या किंमतींवरून सहज लक्षात येईल. मागचे सर्व विक्रम मोडीत काढत नागपूरमध्ये तूरडाळीने 150 रूपये किलोचा पल्ला गाठलाय. त्यामुळे तूरडाळीत भेसळ होत असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
जेवणाच्या डब्यांचा व्यवसाय करणाऱ्या शिवली नांदी. तूरडाळीच्या किंमतींनी अस्मान गाठल्यामुळे त्यांचं व्यवसायाचं बजेटच कोलमडलंय. नंदी यांच्याप्रमाणेच प्रत्येक सर्वसामान्य नागपूरकराला याची झळ पोहोचतेय. सणासुदीच्या काळात तूरडाळीच्या वाढलेल्या किंमतींमुळे  बजेट सावरताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागतेय. 

तुरीच्या या त्रासाला फक्त सर्वसामान्य जनताच नाही तर तूड डाळ व्यापारीही त्रासले आहेत. नागपुरातले तूरीच्या डाळीचे मोठे व्यापारी असलेले ज्ञानेश्वर रक्षक यांची तूरडाळीची महिन्याची विक्री १०० पोत्यांवरून २५ पोत्यांवर आलीय. मोठे व्यापारी साठेबाजी करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. एवढच नाही तर तूरडाळीने एवढा मोठा भाव गाठल्याने त्यात भेसळही होत असल्याची शंका त्यांना आहे

तूरडाळीने सध्या सर्वसामान्याला खरोखर रडवलंय. विघ्नहर्त्याचा उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलाय. त्यामुळे आता राज्यावर आलेलं महागाईचं हे विघ्न दूर व्हावं यासाठी त्या विघ्नहर्त्यालाच साकडं घालण्याची वेळ आलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.