मुंबई : कल्याण-डोंबिवलीतील राजकारण अधिक गढूळ झालेले पाहायला मिळाले. शिवसेना-भाजपने एकदम टोकाचा प्रचार केला. विकासाचा मुद्दा पाठिमागे पडला. दोघांनीही आम्हीच सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र, जनतेने त्यांच्या पारड्यात मते टाकताना त्यांची जागा दाखवून दिली. मनसेला नाकारलेच. मात्र, त्यांची भूमिका महत्वाची ठरलेय.
अधिक वाचा : कल्याण-डोंबिवली निवडणुकीत राज ठाकरेंचा लकी नंबर
पालिकेत शिवसेना - ५२, भाजप - ४२, मनसे - ९, आघाडी - ६, इतर - ११ अशी स्थिती असणार आहे. शिवसेना - भाजप निवडणुकीत उभय पक्षांमध्ये तुल्यबळ लढत झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, बहुमतापासून शिवसेना १० पावले मागे राहिले. वर्चस्व सिद्ध करण्यात शिवसेनेला यश आले असले तरी भाजपने देखील कडवी टक्कर दिली आहे. १२२ जागांपैकी ५२ जागांवर शिवसेनेचा फगवा फडकला असून ४२ जागांवर भाजपचे ‘कमळ’ उमलले आहे.
अधिक वाचा : ...तर कल्याणमध्ये सत्तेच्या जाव्या मनसेकडे ?
मनसेचे इंजिन यावेळी धावले नाही. २७ आकडा गाठणाऱ्या मनसेला दोन अंकी आकडा देखील गाठता आलेला नाही. मनसेचे यंदा केवळ ९ उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची स्थिती तर स्पर्धेतून बाहेर फेकल्यासारखी आहे. आघाडीला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
विद्यमान महापौर कल्याणी पाटील यांचा भाजपच्या सुमन निकम यांनी पन्नास मतांनी पराभव केला. तर, शिवसेनेचे सभागृह नेते कैलास शिंदे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांची मुलगी शिल्पा शिंदे देखील पराभूत झाल्या. त्यामुळे शिवसेनेला हा निकाल विचार करणारा लावणारा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.