कल्याण-डोंबिवली निवडणुकीत राज ठाकरेंचा लकी नंबर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकचा विकास कल्याण-डोंबिवलीकरांनी नाकारलाय. मात्र, राज ठाकरेंचा लकी नंबर त्यांना या निवडणुकीत मिळवून दिलाय. मागील निवडणुकीत २७ जागा जिंकणाऱ्या मनसेला केवळ ९ जागाच राखता आल्यात.

Updated: Nov 2, 2015, 03:35 PM IST
कल्याण-डोंबिवली निवडणुकीत राज ठाकरेंचा लकी नंबर  title=

कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकचा विकास कल्याण-डोंबिवलीकरांनी नाकारलाय. मात्र, राज ठाकरेंचा लकी नंबर त्यांना या निवडणुकीत मिळवून दिलाय. मागील निवडणुकीत २७ जागा जिंकणाऱ्या मनसेला केवळ ९ जागाच राखता आल्यात.

राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत लोकांनी नाकारले होते. त्याचीच पुनरावृत्ता पालिका निवडणुकीत दिसून आली आहे. केडीएमसी मतमोजणीत मनसेला केवळ ९ जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या जागांमध्ये घट झाली आहे. 

एकहाती सत्ता द्या, ही राज ठाकरे यांची मागणी कल्याण-डोंबिवलीकरांना पसंतीला पडलेली दिसत नाही. एकहाती सत्ता द्या, नाशिकसारखा कल्याण-डोंबिवलीचा विकास करून दाखवतो, या मुद्द्यावर मनसेने कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रचार केला होता. यासाठी स्वतः राज ठाकरे यांनी कल्याण आणि डोंबिवलीमध्ये मिळून तीन सभा घेतल्या होत्या. मात्र, त्या सभांमधील गर्दी मतांमध्ये परिवर्तीत झाली नाही.

राज यांनी राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या कारभारावर तीव्र टीका केली होती. मात्र, यानंतरही मतदारांनी मनसेला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या इतक्या जागांवरही यश मिळवून दिलेले नाही. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या जागांमध्ये घट झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.