कल्याणचा महापौर ११ नोव्हेंबरला निवडणार

 कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाची निवडणूक ११ नोव्हेंबरला १२ वाजता होणार आहे. ७ तारखेपासून अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 

Updated: Nov 4, 2015, 06:19 PM IST
कल्याणचा महापौर ११ नोव्हेंबरला निवडणार  title=

कल्याण :  कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाची निवडणूक ११ नोव्हेंबरला १२ वाजता होणार आहे. ७ तारखेपासून अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 

शिवसेनेचे दिपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरपदाच्या रिंगणात शिवसेना सर्वप्रथम उतरेल. दुसरीकडे मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष लागलंय. 

स्थानिक मनसे नेते भाजपासोबत जाण्यास उत्सुक असल्याचं समजतंय. मात्र मुंबईमध्ये उद्धव आणि राज यांचे मामा चंदूमामा वैद्य शिवसेना-मनसे युतीसाठी प्रयत्नशिल आहेत. 

दरम्यान, 4 अपक्ष नगरसेवक, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचं पुढे आलंय. त्यामुळे सेनेचं संख्याबळ 59च्या घरात पोहोचतंय.... भाजपा मात्र स्वतःचे 42 आणि 27 गाव संघर्ष समितीचे 9 जण असे 51 जण असल्याचा दावा करतंय. त्यामुळे शिवसेना सत्तेच्या अधिक जवळ पोहोचल्याचं चित्र निर्माण झालंय. 

दरम्यान  शिवसेनेकडून महापौरपदासाठी दिपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे महापौरपदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचं बोललं जातंय. शिवाय येत्या 9 किंवा 12 तारखेला महापौरपदाची निवडणूक होण्याची शक्यताय. अशा स्थितीत मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं शिवसेनेशी संघर्ष टाळायचं ठरवल्याचं बोललं जातंय. 

महापौरपदावरचा दावा भाजपनं मागे घेतला तर शिवसेनेला सत्ता स्थापन करणं अधिक सोपं होणार आहे. भाजप थेट शिवसेनेला पाठिंबा देऊन स्थायी समितीसह काही महत्त्वाची पदं पदरात पाडून घेणार की विरोधी पक्षात बसणं पसंत करणार, याची उत्सुकता आहे. मात्र भाजपनं पाठिंबा न दिल्यास जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला मनसेची मदत घ्यावी लागेल... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.