कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले, भाजपला घेरले

मुंबई उपनगर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याचबरोबर भाजपवर चहूबाजुने दडपशाहीचे आरोप वाढू लागलेत. काँग्रेस, शिवसेनेपाठोपाठ मनसनेने गंभीर आरोप केलेत.

Updated: Oct 3, 2015, 02:35 PM IST
कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले, भाजपला घेरले title=

विशाल वैद्य, कल्याण : मुंबई उपनगर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याचबरोबर भाजपवर चहूबाजुने दडपशाहीचे आरोप वाढू लागलेत. काँग्रेस, शिवसेनेपाठोपाठ मनसनेने गंभीर आरोप केलेत.

शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या सत्तेच्या गैरवापराच्या आरोपानंतर आता मनसेनेने सुद्धा भाजपवर हल्लाबोल करत दडपशाहीचा आरोप केलाय. भाजपच्या या  दडपशाही विरोधात मनसे नगरसेवकाने चक्क आत्महत्येचा इशारा दिलाय.

मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक शरद ऊर्फ तात्या गंभीर राव यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. सत्तेच्या गैरवापर करुन पक्षांतर करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. डोंबिवलीतील एका प्रभागाच्या उमेदवारीवरुन आपल्याला धमकावल्याचा दावा त्यांनी केलाय.

एक तर पक्षांतर करुण भाजपमध्ये या किंवा  आपल्याला पाठिंबा दया अन्यथा ठार मारू, अशी धमकी भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष महेश पाटील यांनी आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना दिली असल्याचा आरोप गंभीर राव यांनी केलाय. त्यामुळे आपण दहशतीच्या सावटाखाली जगत असून आपल्याला न्याय न मीळल्यास आत्महत्या करण्याची धमकी त्यांनी दिली आहे.

महेश पाटील यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. मनसेच्या पायाखालची वाळू सरकली असून गंभीरराव पक्षात आले तरी त्यांना कोणी घेणार नाही इतकी दयनीय अवस्था मनसेची झाली आहे. आपली लोकप्रियता बघून केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हा स्टंट असल्याचा पलटवार महेश पाटील यांनी केलाय.

तोडफोडीच्या राजकारणानंतर आता दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना थेट धमकावल्याचा आरोप आता भाजपवर होऊ लागलाय. काँग्रेस, शिवसेना आणि आता मनसेने केलेल्या आरोपांमुळे भाजप घेराला गेलाय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.