काश्मीरमध्ये सौरभ फराटे यांना हौतात्म्य

१३ वर्षपूर्वी सैन्यात भरती झालेले सौरभ फराटे आपली दोन महिन्याची सुट्टी संपवून ९ तारखेलाच पुण्यातून निघाले होते. 

Updated: Dec 18, 2016, 03:54 PM IST
काश्मीरमध्ये सौरभ फराटे यांना हौतात्म्य title=

पुणे : जम्मू काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ल्यामध्ये हडपसर येथील भेकराई नगरच्या, सौरभ नंदकिशोर फराटे शहीद झाले. सौरभ यांच्या हौतात्म्याची बातमी कळताच भेकराई नगर परिसरात शोककळा पसरली.

भेकराई नगर येथील त्यांच्या राहत्या घरी नातेवाईक आणि मित्र परिवाराची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. त्यांच्या मागे त्यांचे वडील, आई पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. 

१३ वर्षपूर्वी सैन्यात भरती झालेले सौरभ फराटे आपली दोन महिन्याची सुट्टी संपवून ९ तारखेलाच पुण्यातून निघाले होते. 

शनिवारी सकाळी त्यांचं त्यांच्या पत्नी आणि मुलींशी व्हीडीओ काँलिंगव्दारे बोलणही झालं होतं. खूप मनमिळावू आणि शांत स्वभावाच्या सौरभ फराटे यांनी देशाच्या सेवेसाठी आपल्या लहान भावाला सैन्यात भरती करून देश सेवा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. 

सौरभ यांचं पार्थिव रात्री पुण्यात आणण्यात येईल. सोमवारी फुरसुंगी इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.