व्हॉटसअप मॅसेज - टाईट जिन्सवरून भावानं केली कॉलेजगोईंग बहिणीची हत्या

अकरावीत शिकणाऱ्या छोट्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावानंच तिची मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडलीय.

Updated: Aug 5, 2015, 10:20 AM IST
व्हॉटसअप मॅसेज - टाईट जिन्सवरून भावानं केली कॉलेजगोईंग बहिणीची हत्या   title=

कोल्हापूर : अकरावीत शिकणाऱ्या छोट्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावानंच तिची मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडलीय.

१८ वर्षीय ऐश्वर्या लाड हिचा या घटनेत मृत्यू झालाय. ऐश्वर्यानं नुकतंच दहावीत ८४ टक्के गुण मिळवून एका चांगल्या महाविद्यालयात प्रवेशही मिळवला होता. 

कॉलेजगोईंग ऐश्वर्याच्या मोबाईलवर अनेक मित्र-मैत्रिणी व्हॉट्सअप मॅसेज यायचे... कॉलेजला जातानाही ऐश्वर्या तंग कपडे घालून जाते... मित्रांसोबत गप्पा मारते... असं तिच्या भावाला - ओंकारला वाटत होतं. यावरूनच ओंकार आणि ऐश्वर्या यांचे नेहमीच भांडण होत होतं. 

मंगळवारी रात्री पुन्हा एकदा असंच भांडण या भावा-बहिणीमध्ये झालं. ओंकारनं बोलण्यासाठी म्हणून ऐश्वर्याला बेडरुममध्ये बोलावून घेतलं... पण, म्हणणं ऐकण्यास नकार देणाऱ्या ऐश्वर्याचा ओंकारला इतका राग आला की त्यानं आपल्या लहानग्या बहिणीला  बेडरुमचा दरवाजा बंद करत काठीनं बेदम मारहाण केली. यातच ऐश्वर्याचा मृत्यू झाला... 

ओंकार-ऐश्वर्याच्या आईच्या हा प्रकार लक्षात येताच आरडाओरड केली... ओंकारनं जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात ऐश्वर्या निपचित पडलेली दिसली. तिच्या डोक्याला जबरदस्त मार बसला होता. शेजाऱ्यांनी ताबडतोब ऐश्वर्याला जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं पण, इथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

ओंकार लाड हा मनोरुग्ण असल्याचं त्याचे शेजारी आणि नातेवाईकांनी म्हटलंय. त्याचा वैद्यकीय दाखलाही पोलिसांकडे देण्यात आलाय. पोलीस पुढील तपास करत आहेत. परंतु, या घटनेनं सगळ्या कोल्हापुरलाच हादरा दिलाय. 
 
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.