कोकण रेल्वे मार्गावर चालत्या गाडीत प्रवाशांना लुटले

मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या त्रिवेंद्रम -वेरावल रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मंगळवारी थरारक प्रसंगाला सामोरे जावे लागले . त्यांच्यामध्येच बसलेल्या चार हल्लेखोर चोरट्यांनी प्रवाशांवर हल्ला चढवला आणि प्रवाशांना लुटले

Updated: Jan 22, 2015, 11:14 AM IST
कोकण रेल्वे मार्गावर चालत्या गाडीत प्रवाशांना लुटले title=

सिंधुदुर्ग : मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या त्रिवेंद्रम -वेरावल रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मंगळवारी थरारक प्रसंगाला सामोरे जावे लागले . त्यांच्यामध्येच बसलेल्या चार हल्लेखोर चोरट्यांनी प्रवाशांवर हल्ला चढवला आणि प्रवाशांना लुटले

चोरट्यांनी ब्लेडने प्रवाशांवर वार करीत त्यांच्याकडील पैसे व मोबाईल जबरदस्तीने लुटले . अचानक सुरु झालेल्या या प्रकाराने त्या डब्यातील  प्रवासी घाबरले. मात्र त्याही परिस्थितीत प्रवाशांनी त्यांना प्रतिकार केला. जवळजवळ अर्धा तास हा प्रकार सुरु होता. 
गाडी सिंधुदुर्गातील झाराप या स्टेशनवर क्रॉसिंगसाठी थांबली असता चोरट्यांनी उडी मारून जंगलात पोबारा केला. मात्र एका चोरट्याला पकडून प्रवाशांनी स्टेशन मास्तरच्या ताब्यात दिले. 

पोलिसांनी व स्थानिक ग्रामस्थांनी जंगलातून आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींच्या हल्ल्यात दोन प्रवासी जखमी झाले . आप्पासाहेब निकम ,रवी एस गौडा ,विजय मिरजकर व अशोक अशी या ४ आरोपींची नावे आहेत . एकूणच या कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.