कल्याणमध्ये कोंबड्या पाळणं पडलं महागात

कोबंडी पाळणं किती महागात पडू शकतं याचा अनुभव कल्याणमध्ये राहणा-या शांताराम म्हात्रे यांना आला. म्हात्रे हे कोंबड्या पाळतात, त्यांची एक कोंबडी शेजाऱ्याच्या एका झाडावर बसली.

Updated: Apr 17, 2016, 12:34 PM IST
कल्याणमध्ये कोंबड्या पाळणं पडलं महागात title=

कल्याण : कोबंडी पाळणं किती महागात पडू शकतं याचा अनुभव कल्याणमध्ये राहणा-या शांताराम म्हात्रे यांना आला. म्हात्रे हे कोंबड्या पाळतात, त्यांची एक कोंबडी शेजाऱ्याच्या एका झाडावर बसली.

या क्षुल्लक कारणावरुन झाडाच्या मालकानं कोंबडीच्या मालकासह त्याच्या मुलावरही जबरदस्त हल्ला केला. त्यात मुलगा आणि वडील दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी शेजाऱ्यावर गुन्हा दाखल केला असून विलास म्हात्रे, हेमंत म्हात्रे, कमलाकर म्हात्रे, असं गुन्हा दाखल झालेल्याची नावं आहेत. महत्वाचं म्हणजे त्यात एका महिलेचाही समावेश आहे.