पवारांचा वाढदिवस महत्त्वाचा... शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय?

शरद पवार यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त दिल्लीत मोठा कार्यक्रम होतोय. त्याचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटणार आहेत. 

Updated: Dec 10, 2015, 10:26 AM IST
पवारांचा वाढदिवस महत्त्वाचा... शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय? title=

नागपूर : शरद पवार यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त दिल्लीत मोठा कार्यक्रम होतोय. त्याचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटणार आहेत. 

अधिक वाचा - खडसे काका दारूबंदी करा, चिमुरडीची आर्त हाक

आज राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार या कार्यक्रमासाठी दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे अधिवेशनात आज राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार नाहीत. तर विरोधीपक्ष म्हणून एकट्या काँग्रेसला गड लढवावा लागेल. त्यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेत कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता नाही.

अधिक वाचा - कडाक्याच्या थंडीत आमदाराचं 'मोबाईल वेड'

दरम्यान, या विषयावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पवारांचा वाढदिवस महत्वाचा...शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे नाही अशी टीका केलीय. शासकीय कामकाज आज नसल्यामुळे कामकाजावर विशेष परिणाम होणार नस्ल्याचं राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.