मोबाईलवर अश्लील भाष्य, मनसे महिलांनी काढली तरुणाची नग्न धिंड

महिलांचे मोबाईल नंबर शोधून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या विकृत परप्रांतीय तरुणाला ठाण्यातील मनसेच्या महिलांनी हिसका दाखवलाय.

Updated: Jun 11, 2016, 11:34 PM IST
मोबाईलवर अश्लील भाष्य, मनसे महिलांनी काढली तरुणाची नग्न धिंड title=

ठाणे : महिलांचे मोबाईल नंबर शोधून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या विकृत परप्रांतीय तरुणाला ठाण्यातील मनसेच्या महिलांनी हिसका दाखवलाय.

या तरुणाला चोप देत या महिलांनी त्यांची भर रस्त्यात नग्न धिंड काढली. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातल्या महिलांना या तरुणानं त्रस्त करुन सोडलं होतं. घाणेरड्या शब्दांत गरळ ओकणं सुरु होतं. मात्र त्याची कोणतीही माहिती मिळत नव्हती.

याबाबत महिलांनी कोपरी पोलिसांतही धाव घेतली. मात्र केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करुन पोलिसांनी निष्क्रियतेचं दर्शन घडवलं. अखेर त्रस्त महिलांनी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी या विकृत तरुणाचा माग घेत त्याला पकडलं आणि चोप देत रस्त्यावर नग्न धिंड काढली. अशा विकृत मनोवृत्तीला फाशीची मागणी या महिलांनी केलीय.