डोंबिवलीत दिवसाढवळ्या कारमधून लाख रुपये लंपास

डोंबिवलीत दिवसाढवळ्या कारमधून एक लाख रुपये लंपास केल्याची घटना घडलीय. अवघ्या पंधरा मिनिटांत संधी साधून ही चोरी करण्यात आलीय. 

Updated: Jul 22, 2016, 08:50 AM IST
 डोंबिवलीत दिवसाढवळ्या कारमधून लाख रुपये लंपास title=

डोंबिवली : डोंबिवलीत दिवसाढवळ्या कारमधून एक लाख रुपये लंपास केल्याची घटना घडलीय. अवघ्या पंधरा मिनिटांत संधी साधून ही चोरी करण्यात आलीय. 

वीरेंद्र शर्मा आपल्या मुलीला सोनारपाडा इथं दवाखान्यात घेऊन गेले होते.. त्यावेळी दवाखान्याच्या बाहेर त्यांनी आपली कार उभी केली. पंधरा मिनिटांनी बाहेर आले असता त्यांना कारच्या खिडकीची काच फोडल्याचं आढळलं. 

पुढं कारच्या आतील एक कप्पा उघडून बघताच त्यांना धक्काच बसला. कारण त्या कप्प्यात ठेवलेले एक लाख रुपये चोरट्याने लंपास केले होते. 

धक्कादायक बाब म्हणजे काच तोडल्याचा कोणताही आवाज नाही, गोंधळ झाला नाही. त्यामुळं पंधरा मिनिटांत झालेल्या या चोरीनं आश्चर्य व्यक्त होतंय. मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.