नागपुरात वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून पोलीस शिपायाची आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका तुरूंग शिपायानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपुरात उघड झालीय. चंद्रपूर जिल्हा तुरूंगात नोकरीला असलेल्या राजू वानखेडे नावाच्या शिपायानं आपल्या नागपूर इथल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैद्यकीय रजा मंजूर झाली नसल्यानं तीन महिन्यांचा पगार निघाला नाही. त्यामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप वानखेडे यांच्या कुटुंबियांनी केलाय. 

Updated: Oct 21, 2015, 11:16 PM IST
नागपुरात वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून पोलीस शिपायाची आत्महत्या title=

नागपूर: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका तुरूंग शिपायानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपुरात उघड झालीय. चंद्रपूर जिल्हा तुरूंगात नोकरीला असलेल्या राजू वानखेडे नावाच्या शिपायानं आपल्या नागपूर इथल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैद्यकीय रजा मंजूर झाली नसल्यानं तीन महिन्यांचा पगार निघाला नाही. त्यामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप वानखेडे यांच्या कुटुंबियांनी केलाय. 

आणखी वाचा - जळगावचा 'जयकांत शिखरे' कोण?

राजू वानखेडे यांची काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्हा तुरूंगात बदली झाली होती. तिथं राहण्याची सोय नव्हती. दरम्यानच्या काळात आधी स्वतः आणि नंतर वडिलांच्या आजारपणामुळं त्यांच्यावर ताण आला. कावीळ झाल्यामुळं त्यांना तीन महिन्यांची रजा घ्यावी लागली होती. पण वैद्यकीय रजा वरिष्ठांनी मंजूर न केल्यानं त्यांचा ३ महिन्यांचा पगार निघाला नाही अशी तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी केलीय. 

दरम्यान या सर्व बाबींबद्दल तुरुंग अधिक्षक योगेश देसाई यांच्याशी संपर्क साधला असता आपण बाहेर असल्यानं या संबंधीची अधिक माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता पोलीस तपासातून काय निघतं, याकडे वानखेडे कुटुंबाचं लक्ष लागलं आहे.

आणखी वाचा - डोक्यात गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.