नागपूरसह विदर्भात हीट वेव्हचा तडाखा, पारा चढला

नागपूरसह विदर्भाच्या अन्य जिल्ह्यात पुन्हा हीट वेव्हचा तडाखा बसलाय. येत्या एक दोन दिवसांत पावसाच्या शक्यतेमुळे तापमान वाढण्याची शक्यता आहे.  

Updated: May 3, 2016, 12:28 PM IST
नागपूरसह विदर्भात हीट वेव्हचा तडाखा, पारा चढला title=

नागपूर : नागपूरसह विदर्भाच्या अन्य जिल्ह्यात पुन्हा हीट वेव्हचा तडाखा बसलाय. येत्या एक दोन दिवसांत पावसाच्या शक्यतेमुळे तापमान वाढण्याची शक्यता आहे.  

काल नागपुरात ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. या हंगामातला पाऱ्याचा हा उच्चांक आहे. गर्मीपासून नागपूरकरांना पुढचे दोन दिवस तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही. 

विदर्भात पाराने कहर केलाय. रविवारी ४५.३ अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदलं गेलं. महिना अखेरपर्यंत ४६ अंशांपर्यंत पारा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूरसह विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात उष्म्याच्या कहर झालाय. मात्र सोमवारी सकाळपासून ढगाळ हवामानामुळे तापमान काहीसं खाली उतरलं. दरम्यान पावसाची शक्यताही वर्तवली जातेय. 

विदर्भ आणि कोकण पट्ट्यात झालेल्या बदलामुळे पावसाची शक्यता निर्माण झालीय. मात्र वाढत्या हीट वेव्हने सर्वसामान्य नागपूरकर चांगलेच धास्तावले आहेत. येत्या एक दोन दिवसांत पावसाच्या शक्यतेमुळे तापमान वाढण्याची शक्यता आहे.