दुष्काळग्रस्तांना मदत करायचीय, नाना-मकरंदने जाहीर केला अकाऊंट नंबर

राज्यात त्यातल्या त्यात मराठवाड्यात असलेली दुष्काळ परिस्थितीपाहून तुमचं मन हेलावत असेल. जर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेसोबत तुम्हालाही दुष्काळग्रस्तांना मदत करायची असेल तर आता थेट मदतीच्या अकाऊंटमध्ये आपण आपली मदत पोहोचवू शकता.

Updated: Sep 15, 2015, 04:06 PM IST
दुष्काळग्रस्तांना मदत करायचीय, नाना-मकरंदने जाहीर केला अकाऊंट नंबर title=

पुणे: राज्यात त्यातल्या त्यात मराठवाड्यात असलेली दुष्काळ परिस्थितीपाहून तुमचं मन हेलावत असेल. जर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेसोबत तुम्हालाही दुष्काळग्रस्तांना मदत करायची असेल तर आता थेट मदतीच्या अकाऊंटमध्ये आपण आपली मदत पोहोचवू शकता.

जनतेकडून येणारी मदत योग्यरित्या शेतकऱ्यांना पोहोचविण्यासाठी नाना-मकरंदने 'नाम' नावाच्या संस्थेची स्थापना केलीय. पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात नानाने जावून त्यांची अधिकृतपणे नोंदणीही केलीय. एसबीआय बँकेचं अकाऊंट उघडून त्याचा नंबर शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा - दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचं नानाचं राजकारण्यांना आवाहन

तेव्हा आपल्याला जर आपली मदत द्यायची असेल तर खालील नंबरवर आपण थेट मदत पाठवू शकता. नाम फाऊंडेशनच्या नावानं आपण खालील अकाऊंटमध्ये पैसे किंवा चेक जमा करू शकता. तसंच ज्या परदेशातील नागरिकांना मदत करायचीय त्यांच्यासाठी खास स्विफ्ट कोड देण्यात आलाय.

Current Account No. - (करंट अकाऊंट नं.) 
35226127148
 
IFSC Code No.(आयएफएससी कोड नं.) 
SBIN 0006319
 
Swift Code No.(एसबीआय स्विफ्ट कोड नं.) 
SBININBB238

 

आणखी वाचा - ...म्हणून मुस्लिम शेतकरी आत्महत्या करत नाही - नाना पाटेकर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.