नारायण राणेंना 'दे धक्का', कट्टर समर्थक पडतेंची 'घरवापसी'

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसंच नारायण राणे यांचे खंदे समर्थक संजय पडते यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

Updated: Jan 31, 2015, 07:04 PM IST
नारायण राणेंना 'दे धक्का',  कट्टर समर्थक पडतेंची 'घरवापसी' title=

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसंच नारायण राणे यांचे खंदे समर्थक संजय पडते यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पडते सेनेत गेल्यानं राणे यांच्या कुडाळ मालवण मतदार संघातील राणेंची टीम खिळखिळी झालीये. 

याआधी राणेंचे पुण्यातील खंदे समर्थक विनायक निम्हण यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आज पडते सेनेत घरवापसी करणार असल्याने राणेंना हा जोरदार धक्का मानला जात आहे.

गतवर्षी ठाणे पालिका क्षेत्रातही राणेंना त्यांच्या समर्थकांनी 'दे धक्का' दिला होता. ठाण्यातील काँग्रेसचे काही नगरसेवक आणि राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ठाणे पालिकेवर शिवसेनेची पकड अधिक मजबुत झाली. आता हीच परिस्थिती राणेंच्या बाल्लेकिल्ल्यात होताना दिसत आहे. त्यामुळे राणेंना हा मोठा धक्का माणण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.