नोट प्रेसमधील भोंगळ कारभार : कारवाईला कर्मचाऱ्यांचा विरोध, मॅनेजरला घेराव

येथील नोट प्रेसमधील भोंगळ कारभाराविरोधात करण्यात आलेल्या कारवाईला कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवलाय. तीन जणांच्या निलंबनाविरोधात कर्मचा-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. कारवाई मागे घेण्यासाठी कर्मचा-यांनी नोट प्रसेच्या मॅनेजरला घेरावही घातला. 

Updated: Jan 19, 2016, 10:40 PM IST
नोट प्रेसमधील भोंगळ कारभार : कारवाईला कर्मचाऱ्यांचा विरोध, मॅनेजरला घेराव  title=

नाशिक : येथील नोट प्रेसमधील भोंगळ कारभाराविरोधात करण्यात आलेल्या कारवाईला कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवलाय. तीन जणांच्या निलंबनाविरोधात कर्मचा-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. कारवाई मागे घेण्यासाठी कर्मचा-यांनी नोट प्रसेच्या मॅनेजरला घेरावही घातला. 

अधिक वाचा : कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

काही दिवसांपूर्वी नोट प्रेसमध्ये एक हजाराच्या दहा कोटी नोटा चुकीच्या पद्धतीनं छापल्या गेल्या होत्या. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेवर या नोटा परत बोलावण्याची नामुष्की ओढवली होती. या प्रकरणी तीन कर्मचा-यांचं निलंबन करण्यात आलं असून सहा कर्मचा-यांना नोटीस बजावण्यात आली आहे.  

महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेला वॉटरमार्क उलटा छापल्याने कोट्यवधी रूपये किंमतीचा पेपर अक्षरशः जाळून टाकण्यात आलाय. कुणालाही समजू नये म्हणून प्रेसच्या आवारात खड्डा करून हे कृत्य करण्यात आलं असा आरोप माजी सचिवांनी केलाय. या प्रकऱणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत आणि सहा कर्मचाऱ्य़ांना नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी संतप्त झालेत.