नाशिक पोलिसांची डेबिट कार्डने दंड वसुली

चलन विमुद्रिकरणावर उपाय म्हणून नाशिक वाहतूक पोलीस विभागाने, रोख रकमेऐवजी डेबीट कार्डच्या आधारे दंडवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Nov 30, 2016, 11:30 PM IST
नाशिक पोलिसांची डेबिट कार्डने दंड वसुली title=

नाशिक : चलन विमुद्रिकरणावर उपाय म्हणून नाशिक वाहतूक पोलीस विभागाने, रोख रकमेऐवजी डेबीट कार्डच्या आधारे दंडवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यात पहिल्यांदाच असा निर्णय घेणारे नाशिक पोलीस आयुक्तालय प्लास्टीक मनी घेणारा विभाग ठरला आहे.

पोलीस आयुक्तांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून बारा स्वाईप मशिन घेतले असून या मशिनला शहर वाहतूक शाखेच्या बँक खात्याशी जोडण्यात आले आहे़.  

शहरातील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचा-यांकडे हे मशिन देण्यात आलेय. तर  टोइंगची कारवाई करणा-या यंत्रणेलाही एक मशिन देण्यात आले आहे.

लोकांनी याचे स्वागत केले असले तरी इतर मुलभूत समस्यांबाबत अशीच तत्परता पोलिसांनी दाखवायला हवी अशी मागणी नागरिक करत आहेत.