पुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा फक्त ४ मतांनी विजय

महापालिका निवडणुकीत यंदा सर्वच पक्षांची जोरदार प्रचार करत ताकद पणाला लावली होती. शिवसेना, भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने याचा फटका कोणाला बसतो याची देखील उत्सूकता होती. मतदानाची टक्केवारी देखील यंदा वाढली. त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार याची देखील उत्सूकता होती.

Updated: Feb 23, 2017, 02:06 PM IST
पुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा फक्त ४ मतांनी विजय title=

पुणे : महापालिका निवडणुकीत यंदा सर्वच पक्षांची जोरदार प्रचार करत ताकद पणाला लावली होती. शिवसेना, भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने याचा फटका कोणाला बसतो याची देखील उत्सूकता होती. मतदानाची टक्केवारी देखील यंदा वाढली. त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार याची देखील उत्सूकता होती.

सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रभागात शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार केला. पण फक्त ४ मतांनी पराभव होण्याचं दु:ख काय असू शकतं हे त्या उमेदवारालाच माहिती असतं. कडूसमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार नंदा सुकाळे यांचा फक्त ४ मतांनी विजय झाला आहे. नंदा जगन्नाथ सुकाळे यांना ४२४९ मते, वंदना राजेंद्र ढमाले यांना ४२४५ मते तर अर्चना चांगदेव ढमाले यांना ३६७८ मते या प्रभागात मिळाली. नोटाचं बटन सुद्धा २३२ लोकांना दाबलं. पण राष्ट्रवादीच्या नंदा सुकाळे फक्त ४ मतांनी विजयी झाल्या.