विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक : मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. त्याचवेळी सरकारचे कान टोचले. शिक्षणातील व्यावसायिकता संपवून गरिबांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे बजावले. तसेच विरोधकांसह शिवसेनेचे नाव न घेता कान टोकले. संघर्ष, संयम साधून विकासाला हातभार लावला पाहिजे. विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक आहे. त्याचवेळी भारतीय संस्कृती जपली पाहिजे, असे भागवत म्हणालेत.

Updated: Oct 22, 2015, 12:11 PM IST
 विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक : मोहन भागवत title=

नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. त्याचवेळी सरकारचे कान टोचले. शिक्षणातील व्यावसायिकता संपवून गरिबांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे बजावले. तसेच विरोधकांसह शिवसेनेचे नाव न घेता कान टोकले. संघर्ष, संयम साधून विकासाला हातभार लावला पाहिजे. विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक आहे. त्याचवेळी भारतीय संस्कृती जपली पाहिजे, असे भागवत म्हणालेत.

 नागपूरमधील रेशिमबाग येथील संघाच्या मुख्यालयात आज पथसंचलन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डीआरडीओचे माजी संचालक विजयकुमार सारस्वत आदी यावेळी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत. परदेशात भारताची पत वाढली असून, इतर देशांशी भारताचे चांगले संबंध निर्माण झाले आहेत. स्वतःच्या हितासह विश्वाच्या हिताचा विचार भारत करत आहे. देशभरात उत्साहाचे आणि विश्वासाचे वातावरण आहे. जगाला भारताकडून नेतृत्वाची अपेक्षा आहे. भारताने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. भारत सहकार्याने चालणारा देश आहे. स्वच्छ भारत, जन-धन, डिजीटल इंडिया, गॅस सबसिडी अशा विविध योजना चांगल्या असून, त्या अमलात आणण्यासाठी वेळ लागेल, असे ते म्हणालेत.

परंपरेने मिळालेली खिळखिळी अर्थव्यवस्था सुधारायला वेळ जाईल. वाढत्या लोकसंख्येनुसार कार्यवाही केली पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकभावना बनवावी लागेल. देशातील निवडणूक व्यवस्था बदलण्याची गरज आहे. निवडणूक व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर त्यांनी बोट ठेवले. सर्व प्रश्नांवर एकच उत्तर आहे की भारतीय संस्कृती, जी सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्यास शिकवते. 

सध्या आयसिससारखा धोका सीमेपलीकडे आहेच, पण देशातील काही तरूण देखील भटकतात, त्याला रोखले पाहिजे. विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक आहे. केवळ भौतिक विकास महत्त्वाचा नसून, अध्यात्मिक विकास महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती समृद्ध आहे, परदेशी संस्कृतीचे अंधानुकरण नको. धर्मातूनच त्याग आणि संयमाची शक्ती मिळते, असे मत  मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

भाषणातील ठळक मुद्दे

- विविधतेत एकता शिकवणाऱ्या हिंदू संस्कृतीमुळेच आपला देश अखंड आहे. 
- दिल्लीतील मशिदीत संघाचे स्वयंसेवक जाऊन आले, तिथे त्यांच्यासाठी कव्वाली म्हटली गेली, हे एकतेचेच उदाहरण आहे.
- विरोधकांसह शिवसेनेला टोला. छोट्या-मोठ्या गोष्टी घडत असतात, पण त्यांचे चित्र मोठे करून दाखवलं जातं.
- शासन, प्रशासन व समाज एकत्र आला तरच भाग्य बदलू शकतं.
- मतभेद असतील तर ते चर्चा करून सोडवले पाहिजेत.
- सीमेपलीकडे असणा-या 'आयसिस'सारख्या दहशतवादी संघटनांचा धोका आहेच, पण आपल्यासमोर देशातंर्गत दहशतवादाचेही संकट आहे.
- भरकटणा-या तरूणांना रोखणे गरजेचे आहे. अशावेळी सरकारची भूमिका खूप महत्वाची आहे.
 - निवडणूक व्यवस्था भ्रष्टाचाराचे कुरण बनायला नको, देशातील निवडणूक व्यवस्थेत बदल होण्याची गरज आहे. 
- प्रशासनप्रणाली अधिक संवेदनशील असायला हवी.
- शिक्षणाचे झालेलं व्यापारीकरण ही सर्वात भयंकर आहे, ते थांबवयाल हवं. 
- शिक्षणव्यवस्था समाजाधारित असायला हवी.  
- बाहेरच्या शक्तिंकडून धर्मांतर होता कामा नये.
- वाढत्या लोकसंख्येनुसार उत्पादन वाढवावे लागेल. 
- व्होट बँकेच्या राजकारणापलीकडे जाणं गरजेचं आहे, देशातील सर्व नागरिकांसाठी लोकसंख्येबाबतचं समान धोरण असले पाहिजे.
- परंपरेने मिळालेली खिळखिळी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी वेळ लागेल.
- जन-धन योजना, स्वच्छ भारत योजना, गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन, यांचे केले कौतुक.
- धर्मातूनच त्याग आणि संयमाची शिकवण मिळते.
- केवळ भौतिक विकास उपयोगी नाही तर अध्यात्मिक विकासही महत्वाचा आहे.
- आपली भारतीय संस्कृती समृद्ध आहे, परदेशी संस्कृतीचे अंधानुकरण करण्याची गरज नाही.
- भारत जगातील विश्वसनीय देश, भारताने जगाला विकासाचे मॉडेल.
- दोन वर्षांपूर्वी देशात निराशेचं वातावरण होते. मात्र, आता उत्साहाचे वातावरण आहे.  
- परदेशात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे, देशांतर्गत वातावरण सुधारत आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करून भाषणाला सुरूवात

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.