गृहमंत्री व्हायचं बोललेच नाही!

मला गृहमंत्री व्हायचं असल्याचं वक्तव्य आपण केलंच नसल्याचं पंकजा मुंडे यांनी केलंय.

Updated: Apr 17, 2017, 07:17 PM IST
गृहमंत्री व्हायचं बोललेच नाही!  title=

परभणी : मला गृहमंत्री व्हायचं असल्याचं वक्तव्य आपण केलंच नसल्याचं पंकजा मुंडे यांनी केलंय. त्या परभणीत बोलत होत्या. काल पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव इथं पोलीस निवासस्थानाचे उदघाटनाच्या आयोजित कार्यक्रमात मला गृहमंत्री व्हायचे असल्याची इच्छा व्यक्त केली होती.

गृहखाते हे माझं आवडतं खातं असून मला या खात्याची मंत्री म्हणून काम करण्याची इच्छा आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी मोठ्या हिमतीने गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी पोलिसांना सदैव प्रोत्साहन दिले. त्यांच्या काळात पोलिसांचे आत्मबल उंचावले होते.  असं ही त्या म्हणाल्या होत्या. आज त्या परभणीत आल्या असता त्यांना यावर पत्रकारांनी विचारलं, त्यावर त्यांनी मी असं काहीही बोललेले नाही, माझा व्हिडीओ तपासा असं सांगून निघून गेल्या.