मंत्रालयाच्या बडतर्फ क्लार्कला पुण्यात अटक

लाच प्रकरणात मंत्रालयातून बडतर्फ करण्यात आलेल्या लिपीकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 17, 2017, 07:06 PM IST
 मंत्रालयाच्या बडतर्फ क्लार्कला पुण्यात अटक title=

पुणे : लाच प्रकरणात मंत्रालयातून बडतर्फ करण्यात आलेल्या लिपीकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 

दिलीप शिर्के असं त्याचं नाव आहे.  त्यानं मुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेड तयार करून त्याद्वारे पुण्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्‍यांच्या बदलीचे बनावट आदेश काढले होते.

 त्यासाठी त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बनावट स्वाक्षरी देखील वापरल्याचे समोर आले आहे. शिर्के याने पाच जणांच्या बदल्या करण्यासाठी पाच लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे.