नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या, 'प्रभू' पावले

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या आणि विकासकामांची भेट मिळाली. तीन नवीन रेल्वे गाड्यांसह एकूण 20 विविध विकासकामांचा शुभारंभ यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 10, 2017, 08:49 AM IST
नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या, 'प्रभू' पावले title=

नागपूर : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या आणि विकासकामांची भेट मिळाली. तीन नवीन रेल्वे गाड्यांसह एकूण 20 विविध विकासकामांचा शुभारंभ यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित होते. राज्य सरकारचे नेहमीच रेल्वेला सहकार्य मिळत आले असल्याचे रेल्वेमंत्री प्रभू यावेळी म्हणाले. राज्य सरकार आणि रेल्वे मिळून एक नवीन कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून विकासासाठी ही कंपनी कार्य करणार असल्याचे रेल्वे मंत्री प्रभू यांनी यावेळी सांगितले.

नागपूर आणि विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी यांना योग्य बाजार मिळावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. तसंच रत्नागिरीचा हापूस, नाशिकची द्राक्षे आणि नागपूरची संत्री महाऑरेंजतर्फे रेल्वे स्टेशनवर विकण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.