व्हिडिओ: ग्रामस्थांचं आंदोलन चिघळलं, पोलिसांचा लाठीचार्ज

पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल ते दापोडीच्या रस्त्याचा वाद चांगलाच पेटलाय. आर्मीचा बंद केलेला हा रस्ता लष्करानं सुरू करावा याकरता ग्रामस्थांनी सुरू केलेलं आंदोलन चांगलंच चिघळलं आहे. 

Updated: May 21, 2015, 03:14 PM IST
व्हिडिओ: ग्रामस्थांचं आंदोलन चिघळलं, पोलिसांचा लाठीचार्ज title=

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल ते दापोडीच्या रस्त्याचा वाद चांगलाच पेटलाय. आर्मीचा बंद केलेला हा रस्ता लष्करानं सुरू करावा याकरता ग्रामस्थांनी सुरू केलेलं आंदोलन चांगलंच चिघळलं आहे. 

सकाळपासून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. पोलिसांनी हजारोंचा जमाव पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाठीमार करत अश्रूधूराच्या नळकांड्याही फोडल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ग्रामस्थांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. तसंच काही वाहनांचीही तो़डफोड केली. 

सध्या बोपखेलमध्ये प्रचंड तणाव असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. बोपखेल ते दापोडी हा रस्ता लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून जातो. मात्र या रस्त्याचा वाद कोर्टात गेला. कोर्टानं गावकऱ्यांच्या विरोधात निर्णय दिल्यानं सैन्यानं लगेचच हा रस्ता बंद केला. 

त्यामुळं ग्रामस्थांनी या विरोधात आंदोलन केलं. हा रस्ता लष्करानं गेल्या आठ दिवसांपासून बंद केल्यामुळं ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.