फेसबुकवर सुसाईड नोट टाकून महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता

फेसबूकवर सुसाईड नोट टाकून पिंपरी चिंचवडमधील एक महाविद्यालयीन विद्यार्थी गायब झालाय. दीड दिवस झाले तरही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

Updated: May 15, 2015, 11:04 PM IST
फेसबुकवर सुसाईड नोट टाकून महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता title=

पिंपरी: फेसबूकवर सुसाईड नोट टाकून पिंपरी चिंचवडमधील एक महाविद्यालयीन विद्यार्थी गायब झालाय. दीड दिवस झाले तरही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

फेसबूकवर चित्रविचित्र फोटो, पोस्ट टाकून लाईक्स मिळवण्याची एक जमातच तयार झालीय. काही जणांनी तर फेसबूकवर सुसाईड नोट टाकून आत्महत्याही केल्याच्या घटना घडल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्येही आता अशीच एक विचित्र घटना घडलीय. आकुर्डीमध्ये डी. वाय. पाटील इंजिनिअरींग कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या अभिजीत व्यवहारे यानं १३ तारखेला रात्री साडेदहाच्या सुमाराला आत्महत्या करण्याची असल्याची पोस्ट टाकली. त्यानंतर तो गायब झालाय. १३ मे च्या रात्री नऊ वाजता जेवण करून महाविद्यालय लायब्ररीत अभ्यासाला जात असल्याचं त्यानं रूम पार्टनरला सांगितलं. त्यानंतर तो परत आलेला नाही. 

'मी हे जग सोडून जात आहे, बाय बाय!' अशी पोस्ट त्यानं टाकलीय. अभिजीतच्या रूम पार्टनरनं मिसिंगची तक्रार दाखल केलीय. 

अभिजीतनं केलेल्या या प्रकाराने त्याचे मित्र, पालक यांना धक्का बसलाय. फेसबुकवर अशी पोस्ट टाकलेल्या अभिजीतनं आईवडिलांचा विचार करून परत यावं अशी अपेक्षा सर्वचजण बाळगून आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.