एका हवालदाराने केली २९ लाखांची चोरी

कुंपणानंच शेत खाल्ल्याची म्हण पुन्हा एकदा पोलिसांच्या बाबतीत खरी ठरलीय. रायगडमधल्या उरण पोलीस ठाण्यात काम करणा-या हवालदारानं तब्बल 29 लाखांची चोरी केल्याचं उघड झालंय.

Updated: Mar 12, 2015, 08:07 PM IST
एका हवालदाराने केली २९ लाखांची चोरी title=

उरण : कुंपणानंच शेत खाल्ल्याची म्हण पुन्हा एकदा पोलिसांच्या बाबतीत खरी ठरलीय. रायगडमधल्या उरण पोलीस ठाण्यात काम करणा-या हवालदारानं तब्बल 29 लाखांची चोरी केल्याचं उघड झालंय.

सुभाष कोकणी असं या पोलीस चोराचं नाव असून, त्याला अटकही करण्यात आलीय. एका गुन्ह्यातील 32 लाख रुपये उरण पोलिसांनी हस्तगत केले होते.

पोलीस ठाण्यातल्या मुद्देमाल कक्षात ही रक्कम ठेवण्यात आली होती. मात्र मे 2014 मध्येही रक्कम चोरीला गेली होती. ही चोरी सुभाष कोकणी या हवालदाराने केल्याच तपासात उघड झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.