नाशिकजवळ रेल्वे घातपाताचा प्रयत्न फसला

हावडा कुर्ला एक्सप्रेसला अपघातग्रस्त करण्याचा प्रयत्न मोटारमनच्या सावधानतेमुळे फसला आहे

Updated: Feb 11, 2017, 08:08 PM IST
नाशिकजवळ रेल्वे घातपाताचा प्रयत्न फसला title=

नाशिक : हावडा कुर्ला एक्सप्रेसला अपघातग्रस्त करण्याचा प्रयत्न मोटारमनच्या सावधानतेमुळे फसला आहे. रात्री एकच्या सुमारात नाशिकजवळील खेरवाडी केळवाडी दरम्यान रुळावर मोठा दगड ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

या दगडामुळे इंजिनचा पुढचा भाग खराब झाला मात्र मोठा अपघात होता होता टळला. या घटनेनंतर एक्सप्रेसला दुसरं इंजिन लावण्यात आलं, मात्र घातपातामागे कोणाचा हात आहे याचा तपास आता पोलीस करताहेत.