भाजप चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या आरपीआयच्या उमेदवारांचे निलंबन मागे

भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या आरपीआयच्या उमेदवारांच निलंबन पक्षातर्फे मागे घेण्यात आले आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 17, 2017, 08:24 AM IST
भाजप चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या आरपीआयच्या उमेदवारांचे निलंबन मागे title=

पुणे : भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या आरपीआयच्या उमेदवारांच निलंबन पक्षातर्फे मागे घेण्यात आले आहे. 

त्याचप्रमाणे याप्रकरणी आरपीआयची पुणे शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्या निर्णयाला देखील स्थगिती देण्यात आलीय. 

पुण्यातील आरपीआयचे ८ उमेदवार भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांची कृती पक्षविरोधी असल्याचं कारण देत पक्षाच्या सरचिटणिसांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र या उमेदवारांनी हा आदेश धुडकावून लावला होता. 

त्यामुळे आठ दिवसांनंतर का होईना पक्ष नेतृत्वाला ब्याकफूटवर जावं लागलय. या उमेद्वारांबाबतच्या निर्णयाला स्थगिती देतानाच राज्यात भाजपसोबतची युती कायम असल्याचं त्यांनी म्हटले आहे.