शरद पवारांनी मोदीचे घेतले मनावर, लागलेत कामाला

विधानसभेत भाजप सरकारला टेकू देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आता पंतप्रधान मोदींची धोरणंही राबवू लागल्याचं चित्र आहे. पंतप्रधानांनी छेडलेल्या स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदवत त्यांनी चक्क बारामतीत झाडू हाती घेतला.

Updated: Nov 14, 2014, 10:37 PM IST
शरद पवारांनी मोदीचे घेतले मनावर, लागलेत कामाला title=

बारामती : विधानसभेत भाजप सरकारला टेकू देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आता पंतप्रधान मोदींची धोरणंही राबवू लागल्याचं चित्र आहे. पंतप्रधानांनी छेडलेल्या स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदवत त्यांनी चक्क बारामतीत झाडू हाती घेतला.

बारामतीच्या रस्त्यांवर पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते झाडू मारताना दिसत होते. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क हातात झाडू घेत रस्ते झाडण्यास सुरुवात केली.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे नाते आता हळूहळू खुलायला लागले आहे. याचा प्रत्यय आज आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भारत स्वच्छता अभियानात सहभागी झाल्याबद्दल त्यांची स्तुती केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.