नागपुरात 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा

विधीमंडळ परिसरात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये जोरदार घोषणाबाजी दिसत आहेत. 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा देण्यात येत आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशऩाचा आजचा दुसरा दिवस विरोधकांच्या मोर्चानं गाजणार असं दिसत आहे.

Updated: Dec 8, 2015, 10:23 AM IST
नागपुरात 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा title=

नागपूर : विधीमंडळ परिसरात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये जोरदार घोषणाबाजी दिसत आहेत. 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा देण्यात येत आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशऩाचा आजचा दुसरा दिवस विरोधकांच्या मोर्चानं गाजणार असं दिसत आहे.

राज्यात आलेल्या दुष्काळावर सरकारनं केलेल्या तोकड्या उपाययोजना आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात आलेलं अपयश या मुद्द्यांवर काँग्रेसच्या नेत्यांनी आज नागपुरात मोर्चा आयोजित केलाय. या मोर्चासाठी काँग्रेसचे राज्यभरातला नेते नागपुरात येतायत. त्यामुळे कालचा दिवस सत्ताधाऱ्यांच्या मोर्चानं गाजल्यावर आता विरोधक मैदानात उतरणार आहेत. 

दरम्यान, महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेनेने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने सुरू असताना स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत भाजप आमदार आशीष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. 

अणे यांचा राजीनामा घेतल्यास विदर्भातील आमदार राजीनामे देतील, असे स्पष्ट करीत केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य लवकरच अस्तित्वात येईल, असे देशमुख यांनी सांगितले. मात्र, अणे यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेना आक्रमक असून त्याखेरीज सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्यांचा अणे यांनी अवमान केला असून महाधिवक्ता पदावर असताना स्वतंत्र विदर्भाची भूमिका घेतल्याने संतप्त झालेल्या शिवसेना आमदारांनी सोमवारी तातडीची बैठक घेऊन अणे यांच्याविरोधात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. खोतकर व गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी अणे यांच्या निषेधाचे आणि अखंड महाराष्ट्र राहिलाच पाहिजे, अशा मागणीचे फलक घेऊन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.