रत्नागिरीत पोटनिवडणुकीत शिवसेनेची बाजी

रत्नागिरी नगरपरिषद पोट निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने बाजी मारली. राजन शेटे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेय. दरम्यान, आमदार उदय सामंत समर्थक राजन शेटे यांना विजय मिळाल्याने राष्ट्रवादीचे उमेश शेट्ये यांना हा हादरा मानला जात आहे.

Updated: Jan 11, 2016, 02:39 PM IST
रत्नागिरीत  पोटनिवडणुकीत शिवसेनेची बाजी title=

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद पोट निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने बाजी मारली. राजन शेटे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेय. दरम्यान, आमदार उदय सामंत समर्थक राजन शेटे यांना विजय मिळाल्याने राष्ट्रवादीचे उमेश शेट्ये यांना हा हादरा मानला जात आहे.

राजन शेटे राष्ट्रवादीच्या केतन  शेट्ये यांचा ६२५ मतांनी पराभव केलाय. राजन शेट्ये यांना १८१३ मते तर केतन शेट्ये यांना ११८८ मते पडली.तर भाजपला सत्तेत असलेल्या आणि नगराध्यक्ष असलेल्या भाजपला तीसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

भाजपच्या उमेश कुलकर्णी यांना केवळ ६५४ मते पडलीत. प्रभाग क्र. २ साठी ही निवडणूक झाली होती. शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या रत्नागिरीत मात्र भाजपला शिवसेनेने मात देत पुन्हा एकदा आपले प्रस्थ सिद्ध केले आहे.