अल्पवयीन मुलीवर बलात्कार, व्हिडिओ क्लिपमुळे धक्कादायक घटना उघड

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार घडल्याची घटना समोर आली आहे. 15 वर्षांच्या मुलीवर तिच्या ओळखीच्या दोन मुलांनी बलात्कार केला. दरम्यान, व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे सगळा प्रकार उघड झाला आहे. 

Updated: Jan 21, 2017, 11:21 AM IST
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, व्हिडिओ क्लिपमुळे धक्कादायक घटना उघड title=

औरंगाबाद : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार घडल्याची घटना समोर आली आहे. 15 वर्षांच्या मुलीवर तिच्या ओळखीच्या दोन मुलांनी बलात्कार केला. दरम्यान, व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे सगळा प्रकार उघड झाला आहे. 

बलात्कार करणाऱ्या आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे तर दूसरा आरोपी 19 वर्षांचा आहे. इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. या मुलांनी अत्याचार करतानाची व्हिडिओ काढला. ही व्हिडिओ क्लिप सुद्धा व्हायरल केली आहे. व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

या प्रकरणी दोन्ही आरोपींना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याच्या  धमकीमुळे ही मुलगी 15 दिवस गप्प राहिली होती. मात्र व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे सगळा प्रकार उघड झाला आहे.