कांदा साठेबाजांवर छापे, इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात

नाशिक जिल्ह्यात कांदा साठेबाजांवर छापे टाकण्यात आलेत. तहसिलदार, सहाय्यक निबंधकांकडून तपासणी करण्यात आलीय. तर महागाईला आळा घालण्यासाठी इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात करण्यात आलाय.

Updated: Aug 22, 2015, 02:13 PM IST
कांदा साठेबाजांवर छापे, इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात  title=

नाशिक, नवी मुंबई : नाशिक जिल्ह्यात कांदा साठेबाजांवर छापे टाकण्यात आलेत. तहसिलदार, सहाय्यक निबंधकांकडून तपासणी करण्यात आलीय. तर महागाईला आळा घालण्यासाठी इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात करण्यात आलाय.

कांदा साठेबाजीच्या संशयावरुन जिल्हाधिका-यांनी हे आदेश दिले. नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापारी गोदामांवर ही कारवाई कऱण्यात आलीय. भाव प्रति क्विंटल 6000 वर गेल्यानं शासनदरबारी खळबळ माजली आहे. 

कांद्याच्या दरानं नवा उच्चांक गाठलाय. लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कांद्याला 6326 रूपये प्रति क्विंटल भाव मिळालाय. 2013 साली भाव 6299 रूपयांपर्यंत पोहोचला होता. आजमितीस सरासरी भाव 5700 रुपये तर किमान भाव 3200 रूपये प्रति क्विंटल आहे.
 
गगनाला भिडलेले दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याची आयात सुरु झालीय. इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात करण्यात आलाय.. एलीगंड्स फुड्स या कंपनीने इजिप्तचा कांदा दुबईवरून समुद्राच्या मार्गे मागविला होता. गुरूवारी रात्री ३ कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटी बंदरामध्ये दाखल झालाय. श्री स्वामी सर्मथ शिपींग कंपनीने सोपस्कर पूर्ण करून शुक्रवारी रात्री कांदा जेएनपीटी बंदराबाहेर काढलाय. सर्व प्रक्रिया पूर्ण करून कांदा बंदराच्या बाहेर काढला असून आजच तो विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे..  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.