जिल्हा शासकिय रुग्णालय संकल्पनेला हरताळ

ग्रामीण भागातल्या रुग्णांना अल्प दरांत चांगल्या सुविधांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालय ही संकल्पना अस्तित्वात आली. ज्या उद्देशाने ही रुग्णालयं निर्माण केली जातात, त्यालाच हरताळ फासला गेलाय. 

Updated: Nov 20, 2015, 04:38 PM IST
जिल्हा शासकिय रुग्णालय संकल्पनेला हरताळ title=

रत्नागिरी : ग्रामीण भागातल्या रुग्णांना अल्प दरांत चांगल्या सुविधांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालय ही संकल्पना अस्तित्वात आली. ज्या उद्देशाने ही रुग्णालयं निर्माण केली जातात, त्यालाच हरताळ फासला गेलाय. 

रत्नागिरीत येणाऱ्या रुग्णांचेही या समस्येमुळे हाल होत आहेत. रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झालीय. गेल्या महिनाभरात इथल्या ५ डॉक्टरांनी रुग्णालयाला सोडचिठ्ठी दिली. 

११० रिक्त पद भरलीच गेली नाहीत. उरल्यासुरल्या १५ वैद्यकिय अधिकाऱ्यांवर कामाचा अतिशय ताण पडतोय, अशी कबुली जिल्हा शल्यचिकित्सक बी. बी. आरसूळकर यांनी दिली.
  
मंडणगड, दापोली, राजापूर असे दूरवरून रोज किमान ८०० रुग्ण येतात. पण डॉक्टरचं नसल्याने त्यांचे हाल होतात. या गंभीर समस्येमुळे गंभीर रुग्णांना कोल्हापूर किंवा मुंबईला हलवावे लागते. वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची भीती आहे. असे असताना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी गुळगुळीत उत्तर दिले.

रामभरोसे कारभार असलेल्या या रुग्णालयात रिक्त पदं लवकर भरली जाणं गरजेचं आहे. कारण कमी खर्चात उत्तम उपचारांसाठीच ग्रामीण भागातले गरजू रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालांमध्ये येतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.