ठाणे उपायुक्त मारहाण : तीन जणांना अटक, दोघे ताब्यात

महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी तीन जणांना अटक  करण्यात आलीय. दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्य्यात आलंय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 11, 2017, 01:22 PM IST
ठाणे उपायुक्त मारहाण : तीन जणांना अटक, दोघे ताब्यात title=

ठाणे : महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी तीन जणांना अटक  करण्यात आलीय. दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्य्यात आलंय. 

संध्याकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे. या परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करायला पालिका उपायुक्त संदीप माळवी आणि त्यांचं पथक या भागात गेलं होतं. त्यावेळी शंभरहून अधिक फेरीवाल्यांनी, माळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. 

विशेष म्हणजे यावेळी माळवी याना ज्या रिक्षामधून रुग्णालयात नेण्यात येत होतं, त्या रिक्षाची काचही फेरीवाल्यांनी फोडली. या प्रकरणी एकविरा पोळी भाजी केंद्राचे मालक प्रवेश देशपांडे आणि त्यांचे वडील अशोक देशपांडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

तर १०० ते १५० फेरीवाल्यांवर शासकीय अधिका-यावर  जीवघेणा  हल्ला करणे आणि शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करण्या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर माळवी यांना उपचारांसाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.