मराठवाड्यात पुन्हा गारपीट, शेतकरी चिंतेत

लातूर शहरासह जिल्ह्यातल्या निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या काही भागांत मध्यरात्री आणि पहाटे अवकाळी पाऊस पडला. 

Updated: Mar 15, 2017, 05:58 PM IST
मराठवाड्यात पुन्हा गारपीट, शेतकरी चिंतेत  title=

लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यातल्या निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या काही भागांत मध्यरात्री आणि पहाटे अवकाळी पाऊस पडला. औराद शहाजनी, निटूर आणि केळगाव परिसरातही अवकाळी पाऊस बरसला, तर आज दुपारी लातूर शहर, औसा शहर आणि तालुक्यातल्या काही गावांत गारांसह जोरदार पाऊस बरसला त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली.

उस्मानाबादमधील कळंब तालुक्यात तसेच मेंढा परिसरात  वादळी वा-यांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली.. यापावसा सोबत गारपीटही झाल्यानं काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं नुकसान झालंय.

अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातल्या हरभरा, गहू पिकाला फटका बसलाय. मात्र असाच अवकाळी पाऊस राहिला तर ज्वारी काळी पडण्याची भीती व्यक्त होतेय. दरम्यान शेतक-यांनी काढणी केलेल्या हरभरा आणि गव्हाची काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय.