Video - धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न प्राणघातक

एक धक्कादायक मुंबई लोकलचे सीसीटीव्ही फुटेज. धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न कसा प्राणघातक ठरू शकतो, ते पाहा. बदलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हा प्रकार घडला. 

Updated: Dec 3, 2015, 06:47 PM IST
Video - धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न प्राणघातक title=

मुंबई : एक धक्कादायक मुंबई लोकलचे सीसीटीव्ही फुटेज. धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न कसा प्राणघातक ठरू शकतो, ते पाहा. बदलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हा प्रकार घडला. 

इम्ररान शेख नावाचा हा तरूण मुंबईकडे निघालेली १०.५८ची धावती ट्रेन पकडायला गेला. लोकल वेगात स्थानक सोडत असतांना इम्ररानने मालवाहू डब्ब्यात चढायचा प्रयत्न केला. मात्र दरवाजाच्या हॅंडलवरील हात सटकला आणि प्लॅटफॉर्म संपता संपता तो खाली पडला. 

या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सध्या कल्याणच्या मीरा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तेव्हा तुम्ही कधीही धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. अन्यथा तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकते.

पाहा हा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.